वाघोली - वाडेबोल्हाई येथील बालकाश्रम मधील दोन अल्पवयीन मुलांवर शिपाई काही महिन्यापासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो लोणीकंद पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.