
वाघोली - महापालिका, पी एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, वाघोली पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सुमारे ४० हजार चौरस फूट अतिक्रमणावर वाघोलीत हातोडा टाकण्यात आला. यामध्ये शेड, ओटे, फलक, बांधकामे आदींचा समावेश होता. सहा तासात एवढी कारवाई करण्यात आली.