

Wagholi Gas Leak
esakal
वाघोली: जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील कॅन्टीन मध्ये मंगळवारी मध्यरात्री गॅस गळती झाल्याचा गंभीर प्रकार घडला. सुदैवाने आग लागली नाही. पाणी पिण्यासाठी बाहेर आलेल्या मुलीच्या लक्षात आल्याने तिने आरडा ओरडा केला. यानंतर सर्व मुलींना बाहेर काढून गॅस गळती बंद करण्यात आली.