Pune CrimeSakal
पुणे
Pune Crime : जमिनीच्या वादातून चुलत भावावर गोळीबार, वाघोली जवळील घटना; बेकायदा पिस्टलचा वापर, तरुणाची प्रकृती स्थिर
Wagholi Land Dispute : वाघोलीजवळील वाडे बोल्हाई रोडवर जमिनीच्या वादातून चुलत भावाने गोळीबार करून सुशील ढोरे यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
वाघोली : जमिनीच्या वादातून एकाने चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना वाडे बोल्हाई रोडवर गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. गोळी पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.