

Pune School Bus
esakal
वाघोली: स्कूल बसेससाठी शासनाने कडक नियमावली केली. मात्र हे नियम कागदावरच मर्यादित असल्याचं दिसतंय. मद्य प्राशन करून चालक बिनधास्त स्कूल बस चालवितात. त्यामुळेच वाघोलीत बुधवारी ( दि.२८ ) स्कूल बसचा अपघात झाला. पुणे प्रादेशिक परिवहन विभाग, वाघोली वाहतूक पोलिस व शिक्षण खाते मात्र सुस्त आहेत.