

वाघोली, ता. २७ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाघोलीतील वाहतूक कोंडीची अनेक कारणे असली, तरी वाघोली वाहतूक विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या हेही मुख्य कारण ठरत आहे. वाहतूक विभागांतर्गत येणारा एकूण विस्तार पाहता, या ठिकाणी आणखी १५ ते २० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.
सध्या वाघोलीत पुणे-अहिल्यानगर महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरही नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर कधी कोंडी होईल आणि त्यात किती वेळ अडकून पडावे लागेल, याची शाश्वती राहिलेली नाही. प्रामुख्याने सोमवार, मंगळवार आणि शनिवारी वाहनांची संख्या अधिक असल्याने कोंडीचे प्रमाण वाढते. सध्या केसनंद आणि लोणीकंद ही ठिकाणेही वाहतूक कोंडीची केंद्रे बनली आहेत. अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास लागतात. वाघोलीत प्रवेश करणे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असल्याची प्रतिक्रिया पुणे आणि अहिल्यानगरहून येणाऱ्या प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक प्रवासी पहाटे किंवा रात्री उशिरा प्रवास करणे पसंत करतात. मात्र, खासगी ट्रॅव्हल्स बस आणि डंपरच्या संख्येमुळे रात्री उशिरापर्यंत कोंडी कायम असते. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवल्यास या समस्येतून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. चौकात पोलिस उपस्थित असल्यास वाहनचालकांकडून नियमांचे पालन केले जाते, असा अनुभव आहे. या संदर्भात वाघोली वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर तनपुरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
--------------------------
वाघोली वाहतूक विभागाची स्थिती
अधिकारी - दोन
कर्मचारी -- ३९
वॉर्डन -- २२
महिला कर्मचारी -- ९
दररोज हजर कर्मचारी -- २५ ( इतर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या )
एकूण क्षेत्रफळ --- सुमारे ५५ ते ६० किलोमीटर
एकूण चौक -- सुमारे १५
मुख्य कोंडीचे चौक -- वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा, केसनंदगाव चौक, लोणीकंदमधील केसनंदकडे जाणारा चौक
----------------------------------------
वाघोली वाहतूक विभागाची स्थिती
वाघोली वाहतूक विभागांतर्गत सुमारे ५५ ते ६० किलोमीटरचा परिसर येतो. यामध्ये सुमारे १५ चौक असून, वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद फाटा, केसनंदगाव चौक आणि लोणीकंदमधील केसनंदकडे जाणारा चौक ही मुख्य कोंडीची ठिकाणे आहेत. या विभागासाठी दोन अधिकारी आणि ३९ कर्मचारी नियुक्त आहेत. त्याव्यतिरिक्त २२ वॉर्डन आणि नऊ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर कारणांमुळे दररोज सरासरी २५ कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात. विस्तीर्ण क्षेत्रफळ आणि वाढती वाहनसंख्या पाहता हे संख्याबळ अपुरे पडत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.