
लोहगाव : लोहगावातील मुख्य रस्त्यांपैकी लोहगाव-वाघोली हा एक रस्ता आहे. दिवसभरातून हजारो वाहने या ठिकाणाहून ये-जा करत असतात. ज्यात प्रामुख्याने मालवाहतूक गाड्या, पीएमपी बस, स्कूल बस, दुचाकी, चारचाकी गाड्यांचा समावेश असतो. वाघोलीकडे जाताना निमुळता उतार असल्याने या भागातून जाताना वाहनांचा वेग अधिक असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याने रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.