
वाघोली : वाघोलीतील पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाने काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. त्याची दोन दिवस प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली. मात्र कोंडी कमी होण्याऐवजी ती वाढली. अखेर अंमलबजावणी रद्द करावी लागली. या उपाययोजनेला नागरिकांनी विरोध केला आहे. सध्याचे आहे तसेच वाहतुकीचे नियोजन ठेवून रस्ते रुंद करावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.