esakal | वाघेश्वर मंदिर चौकात ट्रक-टेम्पोचा अपघात; महामार्ग रुंदीकरणाचे सुरु होते काम

बोलून बातमी शोधा

wagholi

वाघेश्वर मंदिर चौकात ट्रक-टेम्पोचा अपघात; महामार्ग रुंदीकरणाचे सुरु होते काम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली- वाघोलीतील वाघेश्वर चौकात ट्रक व टेम्पोचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही चालक जखमी झाले. पुणे - नगर महामार्ग रुंदीकरण कामावेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेतली न गेल्याने अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. हा अपघात रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्ग रुंदीकरणाचे रात्री काम केले जाते. असेच काम सुरू होते. यावेळी एका लेनवरून दुसऱ्या लेनवर वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होती. ही वाहतूक वळविताना, तात्पुरते दुभाजक लावण्यात आले होते.

हेही वाचा: मामा- भाची सोबत जात असताना अपघात; मामाचा जागीच मृत्‍यू

रात्रीची वेळ पाहता अन्य कोणतीही पुरेशी काळजी घेण्यात आली नव्हती. या निष्काळजीपनाचा फटका बसून ट्रक व टेम्पो यांच्यात धडक झाली. यामध्ये ट्रक उलटला. स्थानिक तरुणानी जेसीबीच्या साह्याने ट्रकमधील चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. टेम्पो चालकलाही रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली होती. असे काम करताना पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून कामा दरम्यान अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.