
पुणे : ‘पीएमआरडीए’द्वारे राबविण्यात येणाऱ्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेची अडथळ्याची शर्यत अंतिम टप्प्यात आहे. नदीपात्रावर केवळ रोहित्र बसविण्याचे काम बाकी आहे. त्यानंतर चाचणी घेतल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करता येईल. नवीन पाणीपुरवठा योजनेतून महिनाभरात पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.