Wagholi News : तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वत:ला घेतले पेटवून; तरुण ९० टक्के भाजला

28 वर्षीय तरुणाने मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर स्वताहाला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे.
wagholi youth fire himself in front police station crime beating case
wagholi youth fire himself in front police station crime beating caseSakal
Updated on

वाघोली - शिवीगाळ व मारहाण झाल्यानंतर तरुणाच्या तक्रारी नंतर लोणीकंद पोलीसांनी मारहाण करणाऱ्यां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. ती न पूर्ण केल्याने 28 वर्षीय तरुणाने मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर स्वताहाला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे.

रोहिदास अशोक जाधव ( वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास हा डोमखेल रोडवरील सिद्धी पार्क सोसायटी मध्ये राहत होता. या सोसायटीमध्ये पाणी व अन्य कारणावरून त्याचा सोसायटी मधील अन्य दोघांशी व बांधकाम व्यावसायिकाशी वाद होता.

त्यांच्या विरोधात त्याने २२ जानेवारी २०२३ व १० फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीसात तक्रार दिली होती. ते दोघे जण व बांधकाम व्यावसायिक हे आपल्याला सतत शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची त्याची तक्रार होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र मला मारहाण करणाऱ्याना पोलीसांनी अटक करावी अशी त्याची मागणी होती. यासाठी तो सोमवारी पोलीस ठाण्यात व वाघोली चौकीत गेला होता. मंगळवारी सकाळी पुन्हा तो सकाळी ११ च्या सुमारास वाघोली पोलीस चौकीत आला. यावेळी तीन पोलीस कर्मचारी ड्युटीवर होते. त्याने भर चौकीत स्वतःला पेटवून घेतले. नंतर तो त्याच स्थितीत मोकळ्या जागेत पळाला. नागरिक व तिथे असलेल्या पोलीसांनी त्याला पाणी टाकुन विझविले.

तो पर्यंत तो संपूर्ण भाजला होता. त्याला त्वरित तेथील आयमॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यावेळी पोलीस चौकी परिसरात गोंधळ व आरडाओरड झाला. रुग्णालयाने प्राथमिक उपचार करून गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात पाठविले. घटनेनंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजय मगर व सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रुग्णालयात पोलीसांना मारहाण

ज्या खाजगी रुग्णालयात रोहित याला दाखल केले. तेथे काही वेळाने दोन लोणीकंद पोलीस कर्मचारी आले. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील पायऱ्यांवर त्या दोघांना मारहाण केल्याचे कळते.

परस्पर तक्रार

रोहित याने दोन वेळा लोणीकंद पोलीसात शिवीगाळ व मारहाण झाल्याची तक्रार दिली होती. तर त्याने ज्यांच्या विरोधात तक्रार दिली त्यांनीही त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. दोघांचेही अदखल पात्र गुन्हे दाखल होते. मात्र मी ज्यांच्या विरोधात तक्रार केली त्यांना अटक करावी अशी रोहितची मागणी होती. अदखल पात्र गुन्ह्यात अटक करता येत नाही. मात्र त्याने ऐकून घेतले नाही व स्वतःला पेटवून घेतले. असे लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी सांगितले.

रोहित याला वारंवार शिवीगाळ व मारहाण होत होती. त्याला सारखा त्रास देण्यात येत होता. यासाठी तो कारवाईची मागणी पोलीसांकडे करत होता. मात्र कारवाई झाली नाही. हा सर्वच प्रकार सहन न झाल्याने त्याने स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप त्याचे सासरे ढवळे यांनी केला आहे. दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com