

Brutal Assault and Theft in Pasrani Village
Sakal
वाई : पसरणी (ता.वाई) येथीलसुभाषनगर मधील शेतातील एका बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश वृद्ध महिलेला मारहाण करून अंदाजे दोन लाख किंमतीचे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी (ता.२६) पहाटे दीड वाजण्याच्या घडलेल्या या प्रकारामुळे गावात प्रचंड खळबळ उडाली आहे.