वाई:-उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत महिला दिनानिमित्त वाईत महिलांसाठी गिर्यारोहण स्पर्धेचे आयोजन.
वाईत महिलांसाठी
उद्या गिर्यारोहण स्पर्धा
उत्कर्ष नागरी पतसंस्थेतर्फे आयोजन
वाई, ता. ६ : येथील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून दर वर्षीप्रमाणे महिलांसाठी रविवारी (ता. ८) गिर्यारोहण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये साहस, आत्मविश्वास, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच महिला दिन उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता श्री. सोनजाई डोंगर (वाई) येथे पार पडणार आहे. सर्व वयोगटातील महिलांना सहभागी होता यावे, यासाठी वयोगटानुसार स्वतंत्र गट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये गट क्र. १ : वय वर्षे १७ ते ३०, गट क्र.२ : वय वर्षे ३१ ते ४०, गट क्र. ३ : वय वर्षे ४१ ते ५०, गट क्र. ४ : वय वर्षे ५१ ते ६० आणि गट क्र. ५ : वय वर्षे ६१ व त्यावरील खुला गट असा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना खास पारितोषिके, भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. परिसरातील जास्तीतजास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे, संचालिका डॉ. मंगला अहिवळे, अलका घाडगे, नीला कुलकर्णी व वाई जिमखान्याच्या संचालिका प्रीती कोल्हापुरे यांनी केले आहे.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

