

Pune Cold
- प्रज्वल रामटेके
पुणे - नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुणे शहरासह राज्यात अद्याप अपेक्षित थंडी जाणवत नसल्याने नागरिकांची प्रतीक्षा लांबली आहे. काही दिवसांपूर्वी तापमानात घट होऊन गारठा वाढला होता, मात्र आता पुन्हा थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव मंदावला असून, आग्नेय व पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आहे.