Ambegaon : कोळेवाडी गाव गावठाणाच्या प्रतीक्षेत ; गावठाण नसल्याने वाढतोय अनधिकृत बांधकामाचा बोजवारा

नव्याने समाविष्ट झालेल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील आदिवासी बहुल लोकसंख्या आणि निसर्ग संपन्न परिसर असलेल्या कोळेवाडी गावाला अद्याप गावठाण न मिळाल्याने ग्रामस्थांची गावठाणाची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Ambegaon
Ambegaonsakal

आंबेगाव : नव्याने समाविष्ट झालेल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील आदिवासी बहुल लोकसंख्या आणि निसर्ग संपन्न परिसर असलेल्या कोळेवाडी गावाला अद्याप गावठाण न मिळाल्याने ग्रामस्थांची गावठाणाची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.गावाला गावठाण दर्जा मिळण्यासाठी ग्रामस्थांकडून महसुल दप्तरी अर्ज विनंत्या केल्या जात आहेत.परंतु, महसूलकडून या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आल्याची तक्रार आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समितीने केली आहे.शिवाय, भूमाफियांनी गावठाणातील सर्व्हे नंबर मध्येच अनधिकृत प्लॉटींगचा घाट घातला आहे.

कोळेवाडी गावचा जुना सर्व्हे नं १५७ आणि नवीन सर्व्हे नं १७ मध्ये नऊ एकर गावठाण हे महसूल दप्तरी नोंद असल्याच्या माहिती ग्रामस्थ देतात.या गोष्टीला महसूल अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता.परंतु महसुल कडून गावठाणाच्या सीमा ठरल्या नसल्याने गावठाणाच्या जागेत ग्रामस्थांना दमदाटी करून भूमाफिया अनधिकृत प्लॉटींग तसेच अवैध बांधकामे करताना दिसत आहेत.मूळ महसूल कागदपत्रात छेडछाड करून सातबाऱ्यामध्ये जागा वाढवणारे भूमाफिया ग्रामस्थांना कुठेही वाच्यता करू नका म्हणून धमकावत आहेत.

या वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शहर बांधकाम विभाग तसेच पीएमआरडीए सहेतूक आणि अर्थपूर्ण संबंधातून डोळेझाक करत असल्याची तक्रारही युवक समितीने केली आहे.त्यामुळे अवैध बांधकामे वाढत असताना पालिका बघ्याची भूमिका घेवून बांधकामे वाढल्यावर कारवाई करणार का ?असा सवाल स्थानिक करत आहेत.याबाबत हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांना संपर्क केला असता प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

गावठाणाच्या मोकळ्या जागेवर भुमाफियांचे लक्ष्य !

जांभूळवाडी-कोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत पैकी जांभूळवाडी गावाला महसूलकडून गावठाण देण्यात आले आहे.परंतु कोळेवाडीला अद्याप गावठाण नसल्याने येथील  अंदाजे साडे चार ते पाच एकर जागा मोकळी आहे.यावर भुमाफियांचा डोळा असून या जागेच्या महसूल दफ्तरी फेरफार करून प्लॉटींग करण्याचा बेत आखत असल्याची ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

Ambegaon
Pune Traffic : वाघोलीत पुणे नगर महामार्गावरील सांडपाण्याने वाहतुकीस अडथळा ; केसनंद फाटा परिसरात वाहतूक कोंडी

भुमाफियांकडून गावदेवतांवर अतिक्रमण ?

कोळेवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या वाघजाई देवीच्या पालखीची परंपरेप्रमाणे मारुती मंदीराला प्रदक्षिणा घेवून पाच-पावली केली जाते.परंतु मारुती मंदिर परिसरा भोवती भुमाफियांनी अतिक्रमण करून काटेरी कुंपण घातले आहे.त्यामुळे येथे देवीची पालखी प्रदक्षिणा आणि बैलपोळा सणातील बैल प्रदक्षिणा घेता येत नसल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली.

प्रतिक्रिया : 'कोळेवाडीला गावठाण दर्जा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी तहसील व जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार अर्ज केले आहेत. त्याच्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. गावठाणात अनधिकृत बांधकामे आणि प्लॉटींग वाढले आहे.यावर महसूलने योग्य तो निर्णय घेवून कार्यवाही करावी.

- आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती ,कोळेवाडी

'सदरील परिसर हा पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेला आहे.पीएमआरडीए कडून कोळेवाडी येथील विकास आराखड्याचे काम झालेले आहे. एमएलआरसी (महसूल)कडून गावठाण घोषित केल्यानंतर योग्य नियोजन करता येईल.

- विवेक खारवडकर, विकास आराखडा सल्लागार पीएमआरडीए.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com