Ashadhi Wari : संत एकनाथ महाराजांच्या पालखीची वाट बिकट

श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा धाराशिव जिल्ह्यातील दीड किलोमीटरचा प्रवास खडतरच राहिला आहे. पूर्वीपासून एकनाथ महाराज हे खर्डापासून जुन्या रस्त्यानेच वारकऱ्यांसोबत दिंडीने येत असत, आताही सोमवारी (ता. ८) त्याच मार्गावरून महाराजांचा पालखी सोहळा गेला.
Ashadhi Wari
Ashadhi Wari sakal
Updated on

भूम : श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा धाराशिव जिल्ह्यातील दीड किलोमीटरचा प्रवास खडतरच राहिला आहे. पूर्वीपासून एकनाथ महाराज हे खर्डापासून जुन्या रस्त्यानेच वारकऱ्यांसोबत दिंडीने येत असत, आताही सोमवारी (ता. ८) त्याच मार्गावरून महाराजांचा पालखी सोहळा गेला. पण, खराब रस्त्यामुळे खर्डा ते आमराई मार्गे तिंत्रज प्रवास करताना अक्षरशः ट्रॅक्टरमधून पालखी न्यावी लागली.

आषाढी वारीनिमित्त श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी पैठण ते पंढरपूर असा प्रवास करते. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात पालखीने प्रवेश केल्यानंतर दीड किलोमीटरचा प्रवास हा खडतर आहे. अक्षरशः ट्रॅक्टरमधून पालखी आणावी लागली. कारण या मार्गाने पालखीचा रथ चालतच नाही. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत आहे तर, पैठण ते पंढरपूर नव्या पालखी मार्गाची घोषणा केली असून जुन्या मार्गाचा यात समावेश नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

एकनाथ महाराज पालखी मार्ग वर्षानुवर्षे खर्ड्यामार्गे आमराई तिंत्रज असा आहे. शासनाने या जुन्या मार्गावरून रस्ता न करता पुढील अंतर वाढवून पालखी मार्ग आखला आहे. परंतु, जो जुना पालखी मार्ग आहे, तोच शासनाने रस्ता तयार करावा, अशी आमची मागणी आहे.

- रघुनाथबुवा गोसावी,

श्री संत एकनाथ महाराज पालखी प्रमुख.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.