Walchandnagar News : डॉक्टरांनी गळफास घेणाऱ्या व्यक्तीला मृत्यूच्या दारातून आणले परत...

डॉक्टरांना पृथ्वीवरील देव म्हटले जाते... याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील एका कुंटूबाने घेतला.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkarsakal

वालचंदनगर - डॉक्टरांना पृथ्वीवरील देव म्हटले जाते... याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील एका कुंटूबाने घेतला. लासुर्णे (ता. इंदापूर) येथील देसाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. बाबासाहेब कांबळे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी गळफास घेवून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सागरला (नाव बदलले आहे) मृत्यूच्या दारातून परत आणले.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील एका कुंटूबामध्ये गेल्या महिन्यामध्ये दुपारच्या वेळी तीनच्या सुमारास पती-पत्नीमध्ये जोराचे भांडण सुरु होते. भांडणामध्ये ३० वर्षाचा सागर अचानक घरामध्ये जावून दरवाजाला कडी लावून दुपट्याच्या साहय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो.

कुंटूबातील सदस्यांना याची माहिती मिळताच ते दरवाजा तोडून दुप्पटा कापून सागरला खाली घेवून त्याची छाती दाबून प्राथमिक उपचार सुरु केले. त्याचे हातपाय चोळून त्याला १५ मिनिटामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वी सागर चा रक्तदाब मशिनवरती शून्य दाखवत होता. तसेच हद् याचे ठोके खूपच मंदावून बेशुद्ध (कोमामध्ये) होता.

डॉ. बाबासाहेब कांबळे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी तातडीने जीवनरक्षक उपचार सुरु केले.छाती दाबून हद् य सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कृत्रीम प्राणवायू दिला. पहिले २४ तास सागरने उपचाराला कसलाही प्रतिसाद दिला नाही. हळूहळू दुसऱ्या दिवसापासुन हद् याचे ठोके वाढण्यास सुरवात झाली.

तिसऱ्या दिवशी रक्तदाब मशिनवरती दिसू लागला. चौथ्या दिवशी सागर डोळे उघडले. पाचव्या दिवसापासुन श्‍वास घेण्यास सुरवात झाली.सहाव्या दिवशी कृत्रिम श्‍वास देणारी मशिन बंद करण्यात आली. दहाव्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले होते. दहा दिवसामध्ये डॉ. बाबासाहेब कांबळे, डॉ. ज्याेतिराम देसाई, डॉ. पूनम देसाई, डॉ. शशिकांत भोसले, डॉ. प्रतिक बुजुरगे यांच्या अथक प्रयत्नामुळे सागर जीव वाचला. सागरच्या कुंटूबाने सागरला मृत्यूच्या दारातून परत आणल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.

रागावरती नियंत्रण असणे गरजेचे...

यासंदर्भात एम. डी. मेडिसिन, हद् य रोग व मधुमेह तज्ज्ञ डॉ.बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले की, प्रत्येकाने रागावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. रागामध्ये घेतलेले निर्णय चुकू शकतात. सागरवरती गोल्डन अव्वरमध्ये उपचार झाल्यामुळे तसेच नशिबाने साथ दिल्यामुळे सागरचे प्राण वाचविण्या यश आले.

एखाद्या व्यक्तिीने गळ्याला फास लागल्यामुळे त्याच्या मेंदुकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यावरती दाब पडून काम बंद होते. मेंदूचे काम पडण्यास सुरवात झाल्याने व्यक्तिी कोमामध्ये जातो. तसेच माणेच्या मणक्याचे हाड तुटून मेंदूचे श्‍वासयंत्र बंद पडून व्यक्तिीचा मृत्यू होतो.गळफास च्या घटनेमध्ये शक्यतो व्यक्ति दगविण्याची जास्त शक्यता असल्याचे डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com