वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील पोलिस ठाण्याला आय.एस.ओ-९००१-२०१५ हे मानांकन मिळाले असून बारामती विभागातील आयएसओ मानांकन मिळविणारे वालचंदनगर हे पहिलेच व पुणे जिल्हातील दुसरे पोलिस ठाणे ठरले आहे..आयएसओ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ३७ निकषातील नियम, अटी व शर्तीचे तंतोतंत पालन केले असून पोलिस ठाण्याला आयएसओ ९००१-२०१५ मानांकन तसेच स्मार्ट पोलिस ठाण्याला A++ दर्जा मिळाला आहे.सोलापुर येथील संस्थेने केलेल्या पाहणीनुसार पोलीसस्टेशनला 100 पैकी 93 गुण मिळाले आहेत. पोलिस ठाण्याच्या कामकाजाच्या अनुशंघाने दर शनिवारी तक्रार निवारण केले जाते. तसेच दाखल झालेल्या गुन्हामधील 85 टक्के गुन्हांचा निपटारा केलेला आहे..पायाभुत सुविधा, अद्यावत तंत्रज्ञानचा वापर, कामकाजातील तत्परता,सायबर क्राईम, भौगोलिक परिसर, जनतेचे अभिप्राय, तंत्रज्ञान प्राविण्य, संगणीकरण, दस्तऐवज नियंत्रण, रात्रगस्त, अवैध धंदे कारवाई तसेच गंभीरगुन्हे उघडकीस आणुन त्याप्रमाणे कार्यवाही करणे या सर्व गोष्टी आय एस. ओ मानांकनासाठी पात्र ठरल्याने पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला आहे.वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे बारामती - इंदापुर रोडवरील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असलेले जंक्शन गावामध्ये आहे. संवेदनशिल पोलिस ठाणे असून १९९० मध्ये सदर पोलीस स्टेशनची स्थापना झाली असून सन २०२४ मध्ये ९ कोटी रुपये खर्च करुन सुसज्ज इमारत बांधली आहे..पोलीस ठाण्याच्या इमारती मध्ये पोलीस अधिकारी, फौजदार, गोपनीय, दत्परीकक्ष, पासपार्ट, बारनिशी, क्राईम, ठाणे अंमलदार, वायरलेस विभागासाठी स्वतंत्र खोल्या आहेत. महिला व पुरूष कैद्यासाठी कोठडीची सुविधा आहे. तसेच सुसज्ज असे स्वच्छता गृह देखील आहेत. सर्व खोल्यांमध्ये फर्निचर, पिण्याचे पणी,सोलर, फायर सिस्टीम अशा सुविधा दिलेल्या आहेत.तसेच तक्रार देण्यासाठीआलेल्या नागरिकांना स्वतंत्र आसन व्यवस्था तसेच त्यांना वाचन करण्यासाठी विविध प्रकारची वर्तमानपत्र, मासिक व घडामोडी अशी सुविधा करुन दिलेली आहे. तसेच पोलीस ठाण्याचा परीसर ५ एकराचा असून आवारामध्ये अधिकारी निवास सोय आहे. तसेच ३०० विविध प्रकारचे फळजाडे, देशी झाडांची लागवड केलेली आहे..नागरिकांसाठी व पोलिसांच्या वाहनांसाठी स्वतंत्र दोन पार्किंग व्यवस्था आहे. पोलिस ठाण्याला मानांकन मिळवून देण्यासाठी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस उपनिरीक्षक रतिलाल चौधर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.