
वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीमधील कामगारांचा गेल्या अडीच वर्षापासुन रखडलेला वेतनवाढीचा कराराचा प्रश्न मार्गी लागला असून कंपनीतील ६२३ कामगारांना सीटीसी नूसार ४३६९ ते ५०६९ रुपयांची वेतनवाढ मिळणार असल्याची माहिती आय.एम.डी.कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड यांनी दिली.