Ambegaon Double Inauguration : वळती आरोग्य उपकेंद्राचे अवघ्या १५ मिनिटांत दोनदा उद्घाटन; अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गटामुळे गावात चर्चेला उधाण

अवघ्या पंधरा मिनिटांत दोनदा फीत कापल्याने वळती आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन राजकीय वर्चस्वाच्या लढाईचे प्रतीक ठरले, ग्रामस्थांमध्ये कुजबुज आणि चर्चांना उधाण
Walti Health Centre inaugurated twice in 15 minutes, triggering political debate in Ambegaon.

Walti Health Centre inaugurated twice in 15 minutes, triggering political debate in Ambegaon.

Sakal

Updated on

निरगुडसर : वळती (ता.आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बुधवार (ता.२६) रोजी अवघ्या पंधरा मिनिटात दोन वेळा उद्घाटन झाल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. आंबेगाव तालुक्यातील वळती येथे नव्याने उभारलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बुधवार (ता.२६) रोजी एक वाजण्याच्या सुमारास केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com