वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय रंग सन्मान’ जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Waman Kendre

ज्येष्ठ रंगकर्मी व राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना बिहारमधील ‘प्रस्तुति’ नाट्यसंस्थेतर्फे देण्यात येणारा ‘रमेश प्रसाद सिंग राष्ट्रीय रंग सन्मान २०२३’ जाहीर झाला.

Waman Kendre : वामन केंद्रे यांना ‘राष्ट्रीय रंग सन्मान’ जाहीर

पुणे - ज्येष्ठ रंगकर्मी व राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक प्रा. वामन केंद्रे यांना बिहारमधील ‘प्रस्तुति’ नाट्यसंस्थेतर्फे देण्यात येणारा ‘रमेश प्रसाद सिंग राष्ट्रीय रंग सन्मान २०२३’ जाहीर झाला आहे. पटणा येथे उद्या (ता. ३) होणाऱ्या संस्थेच्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

प्रा. केंद्रे यांनी नाट्य दिग्दर्शनात केलेले धाडसी आणि पथदर्शी प्रयोग, भारतीय रंगमंचावर त्यांनी निर्माण केलेली रंगभाषा, आपल्या नाटकातून वंचितांच्या वेदनेला प्राप्त करून दिलेला आवाज, नाट्य प्रशिक्षणात दिलेले अमूल्य योगदान, उभ्या केलेल्या महत्त्वाच्या नाट्यसंस्था आणि भारतीय रंगभूमीच्या विकासात सुरू केलेले पायाभूत उपक्रम, आदींसाठी हा सन्मान देण्यात आला आहे. प्रा. केंद्रे यांना मिळणारा हा सातवा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कार, केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय कालिदास सन्मान, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा ब. व. कारंत स्मृती पुरस्कार तसेच मनोहर सिंग स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

भारतीय समृद्ध नाट्य परंपरेतले अग्रणी कलाकार, विदेशिया या लोककलेचे जनक व बिहारच्या आधुनिक रंगभूमीचा ठोस पाया रचणाऱ्या भिखारी ठाकुर यांच्या राज्यातून मिळणारा हा पुरस्कार म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे. या सन्मानासाठी प्रस्तुति नाट्यसंस्थेचा मी आभारी आहे.

- प्रा. वामन केंद्रे

टॅग्स :puneDeclare