Video : 'मविआ' मध्ये अजित पवार होते नाराज; पुण्यात बोलून दाखवली खदखद

वरिष्ठांना वाटतं मला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Ajit Pawar On Home Ministry : अजित पवार ठाकरे सरकारमध्ये नाराज होते, असे त्यांनी केलेल्या विधानानंतर समोर आले आहे. आघाडी सरकारमध्ये आपल्याला गृहखातं हवं होतं, पण वरिष्ठांनी ते खातं दिलं नाही, अशी खंत पवारांनी बोलून दाखवली आहे. ते पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकरणी बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

Ajit Pawar
Beed : फडणवीस-पंकजा मुंडेंचा एकाच चॉपरमधून प्रवास; नाराजी दूर झाली का?

जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं होतं. मात्र, त्यावेळी अनिल देशमुखांना हे मंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्यानंतर मला द्या म्हटलं तर, तेव्हा वळसे पाटलांना हे पद दिलं, गेल्याचे अजित पवार म्हणाले. वरिष्ठांना वाटतं मला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही असं म्हटल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. हे खर आहे की माझ्याकडे गृहखाते दिले तर मला जे योग्य वाटते तेच करणार असं पवार म्हणाले.

Ajit Pawar
Shivsena : मिलिंद नार्वेकरांची गच्छंती? 'हा' शिवसैनिक होणार ठाकरेंचा राईट हँड

यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सगळ्यांचा समान न्याय देतो, राष्ट्रवादीचा जर कोणी चुकला आणि मला कोणी सांगितले की, दादा याला पोटात घ्या. पण मी कुणालाही पोटात घेत नाही. सगळ्यांना नियम सारखेच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी जीवाचं रान करेल, पण चुकला तर, त्यांच्यावर पांघरुण घालणार नाही असेदेखील अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune District Grieves the Demise of Former Zilla Parishad Chief Jalindar Kamthe
Agriculture Day celebrated at Ghodegao, Ambegaon with a focus on modern farming techniques and farmer recognition
Three Held, Minor Detained as Pune Police Solve Nine Burglary Cases Across Two States
From Darkness to Light: Eye Donation Ends Six Decades of Blindness
Marathi News Esakal
www.esakal.com