मार्केट यार्डात येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता; बाजार समितीची आढावा बैठक अद्याप नाही

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ता.२२ आणि २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी येत आहेत
Warakari inconvenienced in market yard market committee has not held review meeting Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj palkhi pune
Warakari inconvenienced in market yard market committee has not held review meeting Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj palkhi pune sakal

पुणे : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ता.२२ आणि २३ जून रोजी पुण्यात मुक्कामी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीही दरवर्षी सर्व घटकांशी चर्चा करून नियोजन करत असते. मात्र, पालखी आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले असतानाही समितीने नियोजनासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाची, संघटनांची बैठक घेतलेली नाही. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षानंतर संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी होणार आहे. पालखी मुकामी येण्याच्या पार्श्वभूमीवर समितीकडून तयारीचा दावा करण्यात आला असला तरी अद्यापही बाजारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी जनवारे, डुकरांचा वावर आहे. एकीकडे महापालिका, पोलीस प्रशासनाचे नियोजन झाले असताना देखील बाजार समिती प्रशासनाकडून सूचना पलीकडे अद्याप तयारी करण्यात आलेली दिसून येत नाही. जिल्हा प्रशासनासह, महापालिका, पोलीस आदी प्रशासन वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, औषध व पावडर फवारणी, लाईट व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पाणीपुरवठा, वाहतुक व्यवस्था आदी तयारी करत असतात. बाजार समितीच्या मार्केट यार्डातील गुळ-भुसार, फळे, तरकारी, फुले, कांदा-बटाटा आदी विभागात अनेक दिंड्या मुक्कामसाठी असतात. त्यामुळे सर्व सुविधांचा आढावा घेणे गरजेचे असताना समितीने अद्यापी याकडे लक्ष दिले नसल्याचे समोर येत आहे.

अडत्यांकडून करण्यात आलेली व्यवस्था

  • अडत्यांकडून मंडप टाकून तयारी

  • अन्नदान, मेडिकल किट, रेनकोट वाटपाची तयारी

  • बाजारातील अडते, संघटनांकडून मुक्कामाची व्यवस्था

  • अनेक ठिकाणी भजन, कीर्तनाची व्यवस्था

  • २० हजारापेक्षा जास्त वारकरी मार्केट यार्डात मुक्कामाला

मार्केट यार्डात राहण्याची व्यवस्था, अंघोळ आणि अन्नदानासह इतर सेवा अडते मोठ्या प्रमाणावर करत असतात. त्यामुळे मार्केट यार्डात विविध दिंड्याच्या माध्यमातून २० हजारापेक्षा जास्त वारकरी मुक्कामाला असतात. त्यातही बाजार समिती महापालिका, पोलीस प्रशासन, आडते असोसिएशन व दि पूना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत नियोजन करत असते.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर पालखी सोहळा होत असल्याने यंदा वारकऱ्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. अडत्यांकडून पालखी सोहळ्यानिमित्त तयारी झाली आहे.

- करण जाधव, सचिव, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन.

बाजार आवारात वास्तव्यास येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांना बाजार आवारात स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, सी सी टी व्ही, जंतुनाशक औषध व पावडर फवारणी, लख्ख प्रकाश व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे बाबत सूचना दिल्या आहेत. दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बाजार आवारात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने कामकाजास सुरुवात केलेली आहे. वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी पुन्हा पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन, आडते असोसिएशन व मर्चंट चेंबरचे पदाधिकारी, बाजार समिती चे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल.

- मधुकांत गरड, प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com