
पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक दिवाळीच्या पूर्वी होणार की दिवाळीनंतर अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली असताना आज (ता. १०) राज्य सरकारने पुणे महापालिकेसाठी चार सदस्यांचा प्रभाग करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम सुरु होणार आहे. दरम्यान २०११ च्या लोकसंख्येनुसार समाविष्ट गावासह पुण्याची लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार इतकी असल्याने १६५ नगरसेवक असतील असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.