
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रभाग रचना केली जाणार आहे. त्याच वेळी कोणत्या पक्षाला, कोणत्या माननीयांना ही प्रभाग रचना सोईस्कर होणार अशीही चर्चा रंगलेली आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी या अशा चर्चांना मी थारा देत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच प्रभाग रचना होईल. यात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही अशी स्पष्टोक्ती आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिली.