
मार्केट यार्ड : पुण्यात दरवर्षी आषाढी वारी सोहळ्यानिमित्त संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या दोन दिवस मुक्कामी असतात. या काळात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. सोबत असणाऱ्या बहुतांशी दिंड्या पुढील पंधरा दिवस लागणारा किराणा माल खाद्यतेल, तांदूळ, गहू, ज्वारी, मसाले, आटा, मैदा, डाळी आणि कांदा, बटाटा पुण्यातील मार्केट यार्डातून खरेदी करतात. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.