Warkari Discomfort : मार्केट यार्डमध्ये वारकऱ्यांच्या स्वागताला कुजलेला कचरा व गैरसोयींचा सामना करावा लागल्याने भक्तीमय वातावरणात अस्वच्छतेमुळे खंड पडला.
मार्केट यार्ड : मार्केट यार्डातील फळ-भाजीपाला विभागात शुक्रवारी दुपारी वारकऱ्यांचे आगमन होऊ लागले तेव्हा त्यांच्या स्वागताला कचऱ्याचे ढीग होते. दिंड्यांचे ट्रक, टेम्पो तसेच इतर वाहने उभी करण्यातही अडचणी आल्या.