वारजे : पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून करणाऱ्याला 6 तासात अटक

वारजे : पोलीस उपनिरीक्षकाच्या आईचा खून करणाऱ्याला 6 तासात अटक

वारजे : वारजेत पहाटे अनोळखी व्यक्तीने शाबाई अरुण शेलार ( वय - 65, रा. रामनगर वारजे ) या महिलेचा खून केला होता. त्यामुळे वारजेत खळबळ उडाली होती. आणि विशेष म्हणजे ही वृद्ध महिला पोलीस उपनिरीक्षकांची आई होती. गुन्हे शाखा युनिट 3 च्या वतीने संशयित आरोपीला अवघ्या 6 तासात अटक केली.

गुन्हे शाखेचे राजेंद्र मारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे माळवाडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या आईच्या डोक्यात लोखंडी रॉडनें मारून खून करून चोरी केलेल्या दाखल गुन्ह्याचा संलग्न तपास गुन्हे शाखा युनिट 3 कडील पथक अप्पर पोलीस आयुक्त ( गुन्हे) अशोक मोराळे यांच्या सूचना प्रमाणे करत असताना पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी गोपनीय माहिती मिळवून खून व चोरी करून उत्तरप्रदेश येथे ट्रॅव्हालसने पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीची माहिती काढून अपसर अस्लम अली (वय -19, रा. रामनगर पुणे, मूळ गाव मीरापूर, पोस्ट गद्दपूर, तहसील बदलापूर, जिल्हा जोनपूर, उत्तरप्रदेश ) याला सापळा रचून संघमवाडी येथील पार्किंग न. 3 येथून ताब्यात घेतला.

त्यामुळे अवघ्या 6 तासात पोलिसांनी संशयित आरोपीला पकडले. ही कारवाई पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अशोक मोराळे, उपायुक्त ( गुन्हे ) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस हवालदार राजेंद्र मारणे, संतोष श्रीसागर, एकनाथ कंधारे, महेश निंबाळकर, हणमत गायकवाड, रामदास गोणते, दीपक श्रीसागर, विलसन डीसोजा, सुजित पवार, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी कारवाई केली.

चोरीच्या उद्देशाने केला खून

चोरी करण्यासाठी घरात घुसला, पैसे चोरत असतानाच झालेल्या झटापटीत सशयित आरोपीने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकला असावा. या प्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे तपास सुरू आहे. दरम्यान संबंधित व्यक्ती त्यांच्याकडे यापूर्वी कामाला असल्याचे देखील समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com