Warje News : वारज्यातील नवीन पूल खुला

एक मार्गिका सुरू; महामार्गावरील वाहनचालकांना अखेर दिलासा
New Bridge Opens for Traffic in Pune

वारजे : मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाची साताऱ्याच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

Sakal

Updated on

पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावरील वडगाव पूल ते वारजे दरम्यान होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीतून प्रवाशांची आता सुटका होणार आहे. महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावरील मुठा नदीवर बांधलेल्या नवीन पुलाचा मुंबई ते सातारा दिशेकडील भाग वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार असून प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. याचा थेट फायदा दैनंदिन प्रवास करणाऱ्या सुमारे ६० ते ७० हजार वाहनचालकांना होणार आहे. ‘सकाळ’ने हा विषय सातत्याने लावून धरला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com