
पुणे : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुण्यात मुक्काम अन् जागतिक योगदिनाच्या निमित्ताने उद्या (ता. २१) राज्य सरकारच्या पुढाकाराने ‘वारकरी भक्तियोग उपक्रम’ होणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी अन् पुणेकर योगासने करणार आहेत.