
विलास काटे
सासवड : टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचे गोडवे गात चाललेल्या वारकऱ्यांच्या लक्ष लक्ष पावलांनी पुणेकरांच्या साथीने माउलीनामात दंग होत पुणे ते सासवड हा तब्बल ३२ किलोमीटरचा टप्पा लीलया पार केला. आणि पालखी सोहळा सासवडमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी रविवारी रात्री विसावला.