esakal | पुणे शहरात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

पुणे शहरात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - किनारपट्टीवरचा कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रावरून (Arabian Sea) येणाऱ्या ढगांचा प्रवास पुण्याच्या (Pune) दिशेने संथ गतीने होत आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात पुढील ४८ तासात काही भागात जोरदार पावसाची (Rain) इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. मंगळवारी (ता. २०) संपूर्ण जिल्ह्यातच सकाळपासून आकाश ढगाळ होते. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. (Warning of Heavy Rain in Pune City in Next 48 Hours)

जिल्ह्यात लोणावळा येथे १४९.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. शहर आणि परिसरात शनिवार (ता.२४) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. पुढील 48 तास तरी पुणेकरांना कामावर निघताना छत्री आणि रेनकोट सोबत बाळगावा लागेल.

loading image