Scholarship : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षापासून मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल.
money
moneysakal
Updated on

पुणे - मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती गेल्या दोन वर्षापासून मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्यवृत्ती हक्क संवर्धन समितीच्या राज्य समन्वयक रुचिका निलंगेकर यांनी समाज कल्याण आयुक्तालयात निवेदनाद्वारे दिला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि जी.ओ.आय. शिष्यवृत्ती दोन वर्षापासून मिळालेली नाही. ही शिष्यवृत्ती  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ झाली पाहिजे.

विविध शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांबरोबरच संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात यावी. तसेच, मागसवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतल्यास, संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

शिष्यवृत्ती हक्क संवर्धन समितीच्या प्रमुख मागण्या :

- महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ व्हावी

- दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी

- शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी अर्जाची जबाबदारी विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालय प्रशासनावर निश्चित करावी

- शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आठ लाखांपर्यंत असावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sports Scholarship Returns in Pune; Athletes to Receive Financial Support Again
30 English Keywords
Pune
Big Relief for Aspirants: Maharashtra Expands Sarathi Scholarship for Overseas Studies
Sakal India Foundation
Marathi News Esakal
www.esakal.com