
केंद्रीय यंत्रणेचा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सतर्क राहण्याचा इशारा
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या व्यक्तव्यावरून देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीतीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणेने दवे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलिसांना आवाहन केले आहे की दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. काही दिवसांपूर्वी नूपुर शर्मा हिने महम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तिच्या समर्थनात पोस्ट केल्यानंतर उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांचा देखील खून करण्यात आला होता.
Web Title: Warning To Anand Dave President Of Brahmin Federation In Pune After Bjp Nupur Sharma Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..