

Forest Fire Breaks Out in Warulwadi Hills
Sakal
नारायणगाव : वारूळवाडी येथील गणपीर बाबा डोंगर परिसरातील वनक्षेत्रातील गवतालाआज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमुळे वन क्षेत्रातील सुमारे 100 झाडे जळून वनसंपदेचे मोठे नुकसान झाले.कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी,वन कर्मचारी,नारायणगाव पोलीस व आपाद मित्र यांनी ब्लोअर पंपाने पाण्याचा फवारा मारून आग विझवण्यात यश मिळवले.