वारुंजी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कटिबद्ध : नामदेव पाटील

वारुंजी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कटिबद्ध : नामदेव पाटील
Published on

वारुंजी गटाच्या विकासासाठी प्रयत्नशील

नामदेव पाटील; खोडशीत विविध कामांचे भूमिपूजन

कऱ्हाड, ता. १७ : वारुंजी जिल्हा परिषद गटातील मतदारांनी काँग्रेस नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासामुळे मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी पंचायत समिती सदस्य व कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील यांनी दिली.
खोडशी (ता. कऱ्हाड) येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून मशीद ते लक्ष्मी मंदिर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाच्या दहा लाख रुपये खर्चाच्या कामाचे आणि नामदेव पाटील यांच्या प्रयत्नातून संत शिरोमणी रोहिदासनगरजवळ (चर्मकार वस्ती) अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार अंदाजे रक्कम दहा लाख रुपये या दोन्ही कामाचे भूमिपूजन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश भोसले, अर्चना पाटील, पूनम पुजारी, संभाजी पाटील, अमृत पवार, महेंद्र कदम, हणमंत भोपते, विजय माने, प्रवीण पुजारी, गणेश मदने, सिकंदर सुतार, रवी लोंढे, नबीलाल मुल्ला, ठेकेदार अजीम शेख, सागर चव्हाण उपस्थित होते. सुरेश भोसले यांनी स्वागत केले. हणमंत भोपते यांनी आभार मानले.
-------------------------
19834
खोडशी : येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी नामदेव पाटील, समवेत सुरेश भोसले व इतर.
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com