असे होते कोरोनाचे निदान...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

कोरोनाची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली, दुसरी केल्यावर मात्र निगेटिव्ह आल्याचे आपण ऐकले असेल. तुमची तारांबळही उडाली असेल. पण कोरोना निदानासाठी अशा दोन चाचण्या का घेतल्या जातात, त्यांचे अर्थ नक्की काय आहे. त्याबाबत ...

पुणे - कोरोनाची पहिली चाचणी पॉझिटिव्ह आली, दुसरी केल्यावर मात्र निगेटिव्ह आल्याचे आपण ऐकले असेल. तुमची तारांबळही उडाली असेल. पण कोरोना निदानासाठी अशा दोन चाचण्या का घेतल्या जातात, त्यांचे अर्थ नक्की काय आहे. त्याबाबत ...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोठ्या लोकसंख्येचे जलद निदानासाठी प्रथम ‘अँटीजन’ टेस्ट घेतली जाते. आर्थिक दृष्ट्या कमी खर्चाची ही चाचणी काही मिनिटातच होते. या चाचणीची अचूकता कमी असते. परंतु, कोरोना नसल्याचे यातून लगेच स्पष्ट होते. पण निदान पॉझिटिव्ह आल्यास. पक्के निदान करण्यासाठी ‘डीएनए’ची प्रयोगशाळेतील चाचणी घेतली जाते. 

प्रयोगशाळेतील निदान (आरटी-पीसीआर) -

  • व्यक्तीच्या नाकातील स्राव प्रयोगशाळेत पाठवला जातो.
  • आरएनएची वाढ करत डीएनए विकसित केला जातो.
  • रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टीड पॉलिमरेज चेन रिॲक्‍शन (आरटी-पीसीआर) नावाने ही पद्धत ओळखली जाते.
  • अचूकता ७० टक्के आहे. एक ते दोन दिवसाचा कालावधी लागतो.

विषाणुजन्य प्रथिनांचे निदान (अँटिजेन टेस्ट) -

  • संसर्गाने रुग्णाच्या शरीरात विषाणूजन्य प्रथिने (अँटिजेन) तयार होतात.
  • रुग्णाच्या श्वसनमार्गातील नमुने घेतल्यानंतर हे अँटिजेन आहेत की नाही, याची माहिती मिळते. कोरोनाशी निगडित प्रथिने न मिळाल्यास निश्‍चितपणे सांगता येते. परंतु प्रथिने आढळल्यास आरटी-पीसीआर चाचणीकडे जावे लागते. निदान जलद होते. खर्च व अचूकता कमी. 

प्रतिपिंडांचे निदान (अँटिबाॅडीज) -

  • विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात त्या रोगजंतूंचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंडे (अँटिबाॅडीज) तयार होतात. 
  • रक्तचाचणीच्या आधारे प्रतिपिंडे तपासून कोरोनाचे निदान करता येते. 
  • प्रतिपिंडे तयार होण्यासाठी संसर्ग झाल्यापासून किमान आठ ते दहा दिवस लागतात. निदानाला वेळ जास्त लागतो.
  • Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: That was Corona virus diagnosis