

वाशीममध्ये आज रानभाजी महोत्सव
----
वाशीम : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. १४) वाशीम येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, शेतकरी चर्चासत्र आणि ‘फार्मर ग्रुप लीग’च्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
महोत्सवात जिल्ह्यातील विविध भागांतून आणलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन आणि थेट विक्रीचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांतील पोषक व औषधी गुणधर्मांची नागरिकांना माहिती व्हावी, तसेच शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा महोत्सवाचा उद्देश आहे. या वेळी शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून कृषी तज्ज्ञांकडून आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पीक व्यवस्थापन आणि हवामान बदलाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
गटांचा करणार गौरव
‘फार्मर ग्रुप लीग’मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांचा गौरवही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रथम १० उत्कृष्ट गटांसह सहाही तालुक्यांतील प्रत्येकी पाच, अशा एकूण ३० शेतकरी गटांना विशेष सन्मान व बक्षिसे दिली जाणार आहेत. शेतकरी, नागरिक आणि महिला बचत गटांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाहा यांनी केले आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.