Waste Energy Project
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - कचऱ्याचा डोंगर कमी करून त्यातून वीज निर्मिती करण्याच्या संकल्पनेमागे पर्यावरणीय प्रदूषणाचा एक मोठा धोका दडला असल्याचा धक्कादायक दावा एका नवीन अहवालातून समोर आला आहे. ‘सेंटर फॉर फायनान्शियल अकाउंटेबिलिटी’ने (सीएफए) केलेल्या विश्लेषणात, कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा (वेस्ट-टू-एनर्जी) प्रदूषण निर्देशांक १०० पैकी १०० असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोळसा खाणकाम, तांबे वितळविणारे उद्योग आणि कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्पांपेक्षाही या प्रकल्पांची प्रदूषण क्षमता अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.