Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

नियमावली धाब्यावर बसवून मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध आता कडक कारवाई होईल.
Pune News
Pune Newssakal

पुणे : नियमावली धाब्यावर बसवून मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध आता कडक कारवाई होईल. आदेशांचे पालन होत आहे की नाही यावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यांची पथके नियमित तपासणी करतील, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेल तसेच पबमधील आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी नियमावली तयार केली आहे. यात हॉटेलचालक, पबचालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीनंतर हॉटेल, पब सुरू ठेवल्यास कारवाई होईल असे बजावण्यात आले आहे. ध्वनिवर्धकाचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त नसावा, निवासी भागातील सामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी हॉटेलचालक व पबचालकांनी घेणे गरजेचे आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

शहरात काही इमारतींच्या छतांवर (रुफटॉप) हॉटेल सुरू करण्यात आली आहेत. तेथे बेकायदा मद्य विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. बेकायदा मद्य विक्री करणे गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Pune News
Pune Crime news: पुणे हादरलं! पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; खराडी भागातील धक्कादायक घटना

नियमभंग करणारे परमीट रूमचालक, हॉटेलचालक, पबचालक यांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. पोलिसांच्या सूचनांचे पालन न झाल्यास कलम १४४ नुसार कारवाई करण्यात येईल. नियमानुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी आहे. रात्री दहानंतर ध्वनिवर्धकाचा वापर केल्यास कारवाई केली जाईल.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

  • हॉटेल, पबसाठी पोलिसांच्या सूचना

  • हॉटेलमध्ये बाहेरील कलाकार किंवा ‘डीजे’ येणार असल्यास त्याची माहिती देणे गरजेचे

  • स्वच्छतागृह वगळून हॉटेलमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक

  • हॉटेलमध्ये प्रवेशाच्या तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक

  • सीसीटीव्ही चित्रीकरणातील डेटा साठविण्यासाठी दोन डीव्हीआर यंत्रे असावीत

  • हॉटेलमधील कर्मचारी, सुरक्षारक्षकांच्या चारित्र्याची पडताळणी करावी

  • कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल असल्यास त्याला कामावर ठेवण्यासाठी संबंधित विभागातील पोलिस उपायुक्तांची परवानगी आवश्यक

  • हॉटेलमध्ये धूम्रपानासाठी (स्मोकिंग झोन) स्वतंत्र जागा असावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com