सुकलवाडीतील बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रांरभ

सुकलवाडीतील बंधाऱ्याच्या खोलीकरणास प्रांरभ
Published on

वाल्हे, ता. १६ : सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील ढवळदरा परिसरात मातीबंधाऱ्याची दुरुस्ती, गाळ काढणे आणि ओढा खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ शनिवारी (ता. १६) करण्यात आला. ग्रामगौरव प्रतिष्ठान पाणीपंचायत आणि ग्रामपंचायत सुकलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे.
या कामाचे भूमिपूजन ग्राम गौरव प्रतिष्ठान पाणी पंचायतचे अभियंता प्रशांत कुंभारकर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता वाढून परिसरातील भूजल पातळी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. सरपंच संदेश पवार यांनी गावाच्या विकासासाठी जलसंधारणाची गरज अधोरेखित करत, ही कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच उर्मिला पवार, योगेश पवार, धनंजय पवार, नारायण पवार, अमित पवार, ऋषिकेश बळीद, संतोष पवार, नवनाथ पवार, चंद्रकांत यादव व भाग्यश्री कुंभारकर उपस्थित होते. यावेळी प्रशांत कुंभारकर यांनी जलसंधारणाचे महत्त्व स्पष्ट केले. सरपंच संदेश पवार यांनी प्रास्ताविक केले, तर उद्योजक राहुल यादव यांनी आभार मानले.

07109

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com