water tanker
sakal
वडगाव शेरी - खराडी भागातील अनेक मोठ्या सोसायट्यांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. कोट्यवधी रुपये मालमत्ताकर देणाऱ्या एकट्या गंगा कॉन्स्टेला सोसायटीला पाण्याच्या टँकरसाठी वार्षिक ५० लाख रुपये मोजावे लागतात. मागील वीस वर्षांपासून येथील रहिवासी पुरेशा पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत. मात्र, प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.