Sultanpur Water Storage
sakal
मंचर - मंचर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेल्या सुलतानपूर येथील घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा धोकादायक पातळीवर पोहोचला असून अवघ्या १५ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी दिवसांत मंचरकरांवर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंचर नगरपंचायतीकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.