पिंपरी चिंचवडकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले

water-jar.jpg
water-jar.jpg

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांवरील पाणी कपातीच संकट टळल्याने तूर्तास दिलासा मिळाला आहे. 30 जूनपर्यंत सध्याचा साठा पुरेल अशी खात्री महापौर राहुल जाधव यांना आहे. प्रश्न 15 जुलैपर्यंत म्हणजे त्या पुढील 15 दिवसांचा असल्याने पाणी कपात करण्याची गरज नाही.

पाटबंधारे विभागाने 10 टक्के पाणी कपात करावी असं सूचित केलं होतं. शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात आज 80 टक्के साठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला 91 टक्के साठा होता. सध्याचा 80 टक्के साठा 15 जुलैपर्यंत पुरावा म्हणून पाट बंधारा विभागाने पाणी कपात सुचवली होती. मात्र महापौर, गटनेता आणि प्रशासनाच्या बैठकीत पाणी कपात न करण्यावर शिक्कामोर्तब झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com