Water Issue : कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात पाणी कपात सुरूच राहणार, एक दिवसाची राहणार कपात; दुजाभावाच्या वागणुकीने नागरिक संतप्त

Kondhwa Water Cut : कात्रज-कोंढवा भागात पाणीकपात कायम ठेवून संपूर्ण शहराच्या तुलनेत अन्यायकारक वागणूक दिल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Kondhwa Water Cut
Kondhwa Water CutSakal
Updated on

कात्रज : शहराच्या दक्षिण भागात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला. नागरिकांच्या विरोधानंतर चार दिवसांनी तो मागे घेण्यात आला. मात्र, कात्रज-कोंढवा रोड भागात एक दिवस कपात पूर्वीप्रमाणे सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात एकाच भागावर अन्याय का? या प्रश्नावर पाणी पुरवठा विभागाकडे ठोस उत्तर नाही. धोरणात्मक निर्णय असल्याचे एकच उत्तर दिले जाते. मात्र पाणीपुरवठा विभागाचे अपयश आणि वर्षानुवर्षे या भागाला मिळणारी दुय्यम वागणूकीबाबत नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com