Pune Water Cut : पुण्यात पाणी कपातीचा प्रस्ताव; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा

संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागल्याने पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला पाणी कपात करण्याची सूचना केली.
water cut

water cut

sakal

Updated on

पुणे - संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीची चाहूल लागल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाणी कपात करण्याची सूचना केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसा आड पाणी पुरवठा शहरात केला जावा यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर सादर केला आहे. त्यावर आता आयुक्त काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com