घोड शाखा कालव्याला पाणी सोडण्याची मागणी

घोड शाखा कालव्याला 
पाणी सोडण्याची मागणी
Published on

महाळुंगे पडवळ, ता. ८ : कळंब- गणेशवाडी (ता. आंबेगाव) येथून हुतात्मा बाबू गेनू सागराच्या (डिंभे धरण) डाव्या कालव्यातून कुकडी पाटबंधारे विभागाने घोड शाखा कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी दहा गावांतील नागरिकांनी केली आहे.
घोड शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील कळंब, लौकी, थोरांदळे, भराडी, जाधववाडी, नागापूर व जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी आदी गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. पाण्याअभावी पंचक्रोशीतील १३०हून अधिक विहीर व ५०हून अधिक बोअरवेलमधील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. वाढलेल्या तापमानामुळे जनावरांचा चारा सुकून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. लौकी गावातील सहाही बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्याचा परिणाम शेतीमालाबरोबरच पिण्याच्या पाण्यावर होऊ लागला आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे.
‘‘घोड शाखा कालव्याला पाणी सोडण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कुकडी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. लवकरच घोड शाखा कालव्याला पाणी सोडण्याबाबत कार्यवाही होईल,’’ असे कालवा सल्लागार समितीचे सदस्य व भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com