pune Water Resources Department
sakal
पुणे - महापालिकेवर नव्याने निवडून आलेल्या कारभाऱ्यांनी सूत्रे हाती घेण्यापूर्वीच जलसंपदा विभागाने नोटीस पाठवून त्यांचे स्वागत केले आहे. नियमबाह्य पाणी वापर, त्यावरील दंड आणि पाणीपट्टी अशी सुमारे ९५३ कोटी रुपयांची थकबाकीची नोटीस जलसंपदा विभागाने महापालिकेला बजावली आहे. त्यामुळे नवीन कारभारी हा तिढा कसा सोडविणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.