Water Issue : आंबेगाव खुर्द परिसरात पाणी प्रश्न गंभीर; पैसे मोजूनही मिळेना शुध्द पाणी

नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी आंबेगाव खुर्द परिसरातील स्वामी नारायण मंदिर लगत असणाऱ्या सर्व्हे नं. ९८/१आणि ९९/१ मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर.
Swaraj Housing Society
Swaraj Housing Societysakal

आंबेगाव - नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी आंबेगाव खुर्द परिसरातील स्वामी नारायण मंदिर लगत असणाऱ्या सर्व्हे नं. ९८/१आणि ९९/१ मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, पैसे मोजूनही टँकरचे शुध्द पाणी मिळत नसल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

स्वराज्य हौसिंग सोसायटीतील नागरिकांना पावसाळा हिवाळा उन्हाळा अशा तीनही ऋतुत पाण्याचे संकट भेडसावत असून, याकडे स्थानिक लोकप्रतनिधींकडूनही कानाडोळा केला जात असल्याचे स्थानिकांनी सकाळ'ला सांगितले. गाव महापालिकेत गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती परंतु ती अपेक्षाही फोल ठरली आहे.

स्वराज्य हौसिंग सोसायटी मधील तथास्तु फेज १, साई कृष्ण हाइट्स, कृष्ण कुंज फेज एक, दिग्विजय पॅराडाईज ,कृष्ण कुंज फेज दोन आणि तीन, साईकृष्ण रेसिडेन्सी आदी सोसायट्यात साधारण पाचशे सदनिका आहेत. आंबेगाव ग्रामपंचायत होती तेव्हा पासूनच या भागात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. महापालिका निवडणुकी दरम्यान नेते कारभारी पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो अशी फक्त आश्वासने देतात.

महापालिकेने सोसायटीत पिण्याच्या पाण्याची टाकली आहे. परंतु, त्या लाइन मधून सोडले जाणारे पाणी हे अवेळी आणि कमी दाबाने पंधरा ते वीस मिनिटे येते. तर कधी कधी पाणी सोसायटीत पोहचेपर्यंत बंद होते. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पण टँकर मधील पाणीही दूषित असते त्यामुळे त्या पाण्याने चुळही भरता येत नाही.

सोसायट्यात असलेले बोअरवेल मधूनही कमी पाणी येत असल्याने पाण्याची टंचाई वाढली आहे. सततच्या पाणी विकत घेण्याने सोसायट्यांच्या मेंटेनन्स वाढल्याने सोसायट्यांचे बजेट कोलमडले आहे.

  • एकूण सदनिका - ५००

  • लोकसंख्या - १५००

प्रतिक्रिया -

महापालिका समाविष्ट गावातील कर जोरात वसूल करते आहे. परंतु त्या बदल्यात मूलभूत सुविधा माञ देत नाही. कर आम्ही भरतो आणि विकास मात्र शहराचा केला जातो.आंबेगाव बुद्रुक आणि खुर्द परिसरात पिण्याच्या पाण्याची हीच स्थिती आहे. या संदर्भात आम्ही पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत

- अनिल कोंढरे, माजी उपसरपंच आंबेगाव

पाणी सोडण्याचे २४ तासांचे शेड्युल बनविण्यात आलेले असते त्यामुळे पाण्याची वेळ थोडी मागेपुढे होते. आणि सगळीकडे पाणी सोडण्यात येत असल्याने काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यावर उपाय काढण्यासाठी प्रयत्न करतो आहोत.

- काशिनाथ गांगुर्डे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग स्वारगेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com