अडीच कोटी खर्च होऊनही चार वर्षापासून नळाला पाणी येईना? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tank dhamani

सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद आहे.

अडीच कोटी खर्च होऊनही चार वर्षापासून नळाला पाणी येईना?

पारगाव - धामणी ता. आंबेगाव येथील सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत मंजूर असलेली सार्वजनिक पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहे. परिसराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न करूनही योजना सुरु होत नाही. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात दि.२० एप्रिल, ५ मे व ११ मे अशा तीन तारखांना मंत्रालयात तीनदा बैठक बोलावूनही ती कशामुळे अचानक रद्द केली जाते. याचे कोडं काही उलगडत नाही. नागरिकांचे पाण्यावाचून हाल मात्र सुरूच आहे.

सन २०१४-१५ आर्थिक वर्षात तांत्रिक मान्यता असलेल्या हि सार्वजनिक पाणी पुरवठा योजना २०१७ साली चालू होती. संबधित ठेकेदाराचे म्हणणे आहे कि आम्ही योजना चालु स्थितीत जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केली तसे आमच्याकडे पत्र आहे त्यानंतर या योजनेत बिघाड झाल्याने मागील चार वर्षांपासून सदर योजना बंद आहे. या गावची ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे. इतर निवडणुकांचा विचार केल्यास राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षाची गावात सारखीच ताकत आहे. ही योजना सुरु करण्यासाठी ग्रामस्थ वारंवार मागणी करत आहे.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी धामणी येथे येऊन योजनेची पाहणी करून योजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. असे सांगितले त्यासाठी दुसर्या ठेकेदाराने दुरुस्तीचे काम सुरु करूनही एक महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप योजना सुरु झाली नाही.

पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले याबाबत बोलताना म्हणाले आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. गावात शिवसेना व राष्ट्रवादी या दोनच पक्षावरच १०० टक्के प्रेम करणारे ग्रामस्थ असूनही तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे-पाटील मंत्रिमंडळात महत्वाचे मंत्री आहेत तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे महत्वाचे पदाधिकारी असताना धामणीकरांचा पिण्याच्या प्रश्न मार्गी लागत नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा जनतेला काय फायदा अशी खंत व्यक्त करत शिवसेनेला जणु घरचा आहेरच दिला आहे.

या योजनेतील ठळक मुद्दे

- योजना सुरु होण्यासाठी सरपंच सागर जाधव व ग्रामस्थांच्या वतीने २५ ऑगष्ट २०२१ रोजी जिल्हा परिषद पुणे येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी लवकरात लवकर पाणीपुरवठा चालु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते तरीही योजना चालू झाली नाही.

- १५ मार्च २०२२ रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले व ग्रामस्थ, अधिकारी संबधित ठेकेदार यांची बैठक घेतली योजना लवकरच सुरु होणार असे श्री. वळसे पाटील यांनी सांगितले त्यानंतरही काहीही हालचाली नाही. योजनेचे काम केलेल्या ठेकेदाराची दुरुस्तीसाठी असमर्थतता

Web Title: Water Issue In Dhamani Village

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :watervillagedhamani
go to top